शेंदुर्णी ता.जामनेर:ज्ञानेश्वर डी.पाटील―
पाचोरा आणि शेंदुर्णी येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल पाचोरा येथे पॉझिटिव आला होता. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील ७ जनांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे शेंदुर्णी ने आता सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या डॉक्टरांच्या संपर्कातील पाच कर्मचारी आणि दोन रुग्ण यांचे तपासणी अहवाल धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयातून बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान सात जणांना पहूर येथील शाळेमध्ये क्वारटाईन करण्यात आले आहे.
तसेच दिनांक 11, 12 रोजी येथे वैद्यकीय सेवेमध्ये तपासणी केलेल्या रुग्णांचा देखील जीव भांड्यात पडला आहे. तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये आजूबाजूच्या खेड्या वरील तसेच पाचोरा आणि सोयगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.
0