बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

लिंबागणेशकरांनी छञपती शंभुराजे बलिदान दिवस स्मशानभुमीत स्वच्छता मोहीम राबवुन साजरा केला ―डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―आज छञपती संभाजी महाराज बलीदान दिनानिमित्त ग्रामपंचायत & मंगलमूर्ती फाऊंडेशन लिंबागणेश यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात येऊन त्यानिमीत्ताने स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवुन साजरा करण्यात आला.

कायॅक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निवृत्त लेफ्टनंट सुंदरभाऊ वाणी तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच शंकर वाणी , ग्रा.पं.सदस्य सुरेश ढवळे, गणेश लिंबेकर, समीर शेख, विलास जाधव , श्रीहरी निमॅळ, ग्रा..कमॅचारी विशाल वाणी, जीवन मुळे, सुखदेव वाणी व ग्रामस्थ अॅड.गणेश वाणी, सुरेश निमॅळ, आदि उपस्थित होते.
सुंदरभाऊ वाणी यांनी शंभुराजे यांच्या बलिदानाचा जीवनपट उलगडून सांगताना कुठल्याही परिस्थितीला तोंड देत शेतक-यांनी बिकट परिस्थितीत गळफास जवळ न करता धैयाॅने तोंड कसे द्यायचे हे छञपती शंभुराजे यांच्या बलिदानावरून समजून घेतलं पाहीजे.
उपसरपंच शंकर वाणी यांनी कायॅक्रमाचा समारोप करत आभार प्रदशॅन केले.

स्मशानभुमी स्वच्छतेची संकल्पना डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मांडली

छञपती शंभुराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादनपर भाषणात या निमित्ताने स्मशानभुमीत स्वच्छता मोहीम राबवुन साजरी करण्यात यावी.ही संकल्पना मांडली त्याला लागलीच मुतॅरूप देत स्मशानभूमीत जाऊन अस्ताव्यस्त झाडे झुडपे तोडण्यात आली. वाळलेला कचरा पेटवुन देण्यात आला. व जागा समतल करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने पांडुरंग वाणी, महारूद्र वाणी, आकाश नाईकवाडे, प्रकाश नाईगडे, विशाल वाणी, सुरेश ढवळे सुरेश निमॅळ यांचे सहकार्य लाभले.


Back to top button