औरंगाबाद: सोयगाव शिवारात आढळली लष्करी अळी,शहरात शेतकऱ्यांमध्ये खळबळ,कृषी विभागाचा नकार

सोयगाव,ता.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव शिवारातील मक्याच्या पिकांवर सोमवारी लाक्षक्री अळींचा प्रत्यक्ष वास्तव्य आढळल्याने सोयगाव शहरातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून शिवारातील अक्षय काळे यांच्या मका पिकांवरील तब्बल पाच एकरावर लष्कर अळींचा प्रादुर्भाव आणि अंडीचा प्रादुर्भाव मका पिकांच्या पोंग्यात आढळल्याने दुपारनंतर खळबळ उडाली होती.या प्रकरणी मात्र तालुका कृषी विभागाने पाहणी न करताच या प्रकाराचा स्पष्ट इन्कार केला आहे.
सोयगावसह परिसरात सोमवारी अचानक लष्करी अळींचा वधात प्रादुर्भाव आणि अंडी आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून तालुका कृषी विभागाने मात्र आय प्रकाराची दूरध्वनीवरून माहिती घेवून हा प्रकार नसल्याचे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे.शहरातील गट क्रमांक-१३६ मधील अक्षय काळे हे दुपारनंतर शेतात गेले असता त्यांना अचानक हा प्रादुर्भाव आढळला त्यांनी सदरील प्रकाराची माहिती कृषी विभागाच्या कानावर घातली,परंतु कृषी विभागाने मात्र या प्रकारचा नकार दर्शविला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *