सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मराठा प्रतिष्ठानच्या सामाजिक देयत्व उपक्रमात शैक्षणिक मदतीत प्रतिष्ठान अग्रगण्य ठरले असून समाजाचे दूत म्हणून कार्य करणाऱ्या मराठा प्रतिष्ठानचं या उत्तुंग भरारीचे सन्मानाने स्वागत करतो असे गौरोद्गर सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी जरंडी ता.सोयगाव येथे काढले प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळात होरपळून निघालेल्या कुटुंबियांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वितरण कार्यक्रमाचा जरंडी ता.सोयगावपासून करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील,संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे,सरपंच समाधान तायडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद राठोड,जिल्हाध्यक्ष विजय काळे,सुधीर कुलकर्णी,योगेश मानकर,आदींची प्रमुख उपस्थिती होती,प्रास्ताविकात सोपान गव्हांडे यांनी उपक्रमाचे उद्देश स्पष्ट केले.समाजासाठी देणे लागतो या उदात्त हेतूने प्रतिष्ठानचं वतीने दुष्काळी विद्यार्थ्यांना मोगात वह्या वितरण उपक्रम हाती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मराठा प्रतिष्ठानचं वतीने सोपान गव्हांडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक बाळू सूळ,मोतीलाल वाघ,ज्ञानेश्वर युवरे,प्रमोद वाघ,नाना जुनघरे,गुणवंत पाटील,घोसला सरपंच प्रकाश पाटील,ज्ञानेश्वर वाघ,प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष विजय चौधरी,उपाध्यक्ष समाधान जाधव,तालुका सचिव सचिन महाजन,समाधान शिंदे,गोविंदा पाटील,प्रशांत पाटील,सुनील पाटील,बापू सोन्ने,आदींनी पुढाकार घेतला सूत्रसंचालन भरत पगारे यांनी आभार बाळू सूळ यांनी मानले.