औरंगाबाद: गोंदेगाव ता.सोयगावला बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दरोड्याचा प्रयत्न,बँकेतून चोरी गेले इंटरनेटचे रावूटर

सोयगाव,दि.१६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―गोंदेगाव ता.सोयगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर अज्ञातांनी दरोड्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली,दरम्यान बँक व्यवस्थापक आणि बँकेचे कर्मचारी मंगळवारी नियमित वेळेत बँकेत आले असता,त्यांना बँकेच्या मुख्य दरवाज्यासह आतील दरवाज्याचे कडी व कोयंडा तोडून शटरचे सेंटरलॉक तोडल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.याप्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चार ते पाच जणांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदेगाव ता.सोयगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रचं शाखेच्या मुख्य दरवाजासह आतील दरवाजाचे कडी-कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात दरोडेखोरांनी बँकेतील सामान अस्ताव्यस्त करून त्यांना आतमध्ये प्रवेश केल्यावर रोकडची तिजोरी न आढळल्याने त्यांचा बँकेवर दरोड्याचा प्रयत्न फसला असून अखेरीस भांबावलेल्या चोरट्यांचा प्रयत्न असफल झाल्याने पलायन केले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांचेसह पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून बँक व्यवस्थापक संतोषकुमार गौरीशंकर प्रसाद यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार ते पाच अज्ञाताविरुद्ध दरोड्याची गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील,सुभाष पवार,दिलीप तडवी,अनिल चव्हाण,स्वप्नील दिलवाले,कौतिक सपकाळ,सागर गायकवाड,आदी करत आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.