पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

बीड: १४ व्या वित्त आयोगअंतर्गत निधीचा गैरवापर ? ; पाटोदा पंचायत समिती सभापती यांनी केली कारवाईची मागणी

पाटोदा:आठवडा विशेष टीम― १४ व्या वित्त आयोगअंतर्गत निधीचा वापर करून निकृष्ट दर्जाची कामे व कामे न करता बिले उचलणाऱ्या गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या कठोर कारवाई करण्याची मागणी पाटोदा पंचायत समिती सभापती पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना ०१/०१/२०१९ रोजी व २५/०२/२०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांनी १४ व्या वित्त आयोगाबद्दल माहिती द्यावी असे पत्र काढले. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ पर्यंत आतापर्यंत ५ ते ६ ग्रामपंचायतची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण ग्रामपंचायतची समिती नेमून क्रॉस चेकिंग करण्यात यावी.निकृष्ट दर्जाचे कामे व काम न करता बिले(देयके) देणाऱ्या या काळातील गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पाटोदा पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.