लोकसहभागातून कुपोषण मुक्ती ; कंक्राळा गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष आरोग्यशिबिराचे आयोजन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―लोकसहभागातून गाव कुपोषण मुक्त ही काळाची गरज आहे असे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी कुपोषण मुक्त अभियान याच्या आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

एकात्मिक बालविकास योजना व प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी व संजय शहापूरकर यांच्या संयुक्त विद्यमाने कंक्राळा हे गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंदाताई राजपूत, वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार ,आरोग्य सेविका शितल चेके ,अंगणवाडी सेविका शोभाताई बिंदवाल व संजय शहापूरकर उपस्थिती होते.
प्रास्ताविक भाषणात संजय शहापूरकर यांनी सांगितले की 18 वर्षापासून तालुक्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासन व लोकसहभागातून उपक्रम सुरू आहे त्यामुळे अनेक बालके साधारण श्रेणीत आले आता गाव कुपोषण मुक्त करावा ही संकल्पना समोर आली आणि कंक्राळा गावाची निवड केली आता दर महिन्याला मुलांच्या आरोग्य तपासणी होणार असून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात येईल जोपर्यंत ही सर्व मुले सर्व साधारण श्रेणीत येत नाही तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले की संजय शहापूरकर हे अनेक वर्षापासून कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न करीत आहे त्यामुळे शासन व लोकसह भागातील हा त्यांचा पहिला उपक्रम ठरला आहे भारताचे आधारस्तंभ असणारी ही बालके सुदृढ रहावी यासाठी कंक्राळा गाव कुपोषण मुक्त करण्याचा संजय शहापुरकर यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच चंदाताई राजपूत यांनी ग्रामपंचायत ग्रामस्थ हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी डॉक्टर विद्या पवार यांनी केली.
याप्रसंगी आरोग्य सेविका शितल चेके ,मदतनीस संगीता बडकने ,अंगणवाडी सेविका शोभाताई बिंद वाल ,भागवत बिडकर ,स्वप्नील बावस्कर ,सागर गायकवाड ,ईश्वर निकम, कृणाल राजपूत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.