लोकशाही प्रबळ करण्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील मतदार नोंदणी राहिलेल्या युवकांनी मतदार नोंदणी करावी―जयदत्त धस

पाटोदा:गणेश शेवाळे― आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील अठरा वर्षापुढील युवकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये येण्यासाठी दि.15 जुलै 2019 ते दि.19 ऑगस्ट 2019 पर्यत या कालावधीत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला असुन वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह आपल्या गावातील मराठी शाळा / अंगणवाडी सेविका/ निवडणूक विभागाकडे संपर्क साधावा नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे १) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट २) रहिवासी दाखला ग्रामसेवक किंवा तलाठी यांचे सहीचा ३) आधार कार्ड झेरॉक्स ४) १ पासपोर्ट साईज फोटो ५) घरातील नात्यातील(आई, वडील,भाऊ, बहीण) यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे
6) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला 7)१ पासपोर्ट साईज फोटो 8)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.9)माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला 10) पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स 11) असल्यास लग्नपत्रिका मतदारांनी आपली नावे नोंदवून घ्यावीत व मतदानचा आपला हक्क/अधिकार प्राप्त करा असे आव्हान आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील युवा नेते जयदत्त धस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *