औरंगाबाद: जय भगवान महासंघाचा शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियानांतर्गत नविन उपक्रम

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―जय भगवान महासंघाचा शासकीय रुग्णालयात स्वच्छता अभियानांतर्गत नविन उपक्रम राबविण्यात आला.
२ ते ३ दिवसापुर्वी जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप साहेब हे औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) येथे पेशंटला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या जसे की रुग्णालयातील वार्डामध्ये अस्वस्थता आढळून आली.

शौचालये व स्नान गृहमध्ये मोठ्या प्रमाणात घाण होती.वार्डामधील काही रुग्णांचे व रुग्णांचे नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की आजारापेक्षा येथील शौचालय व स्नानगृहाच्या दुर्गधीमुळे आजार बरा होण्यापेक्षा आजार वाढत आहे.

या साठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संघटना जय भगवान महासंघाच्या वतिने शासकीय रुग्णालय(घाटी) येथे स्वच्छता अभियान आज सकाळी २०/०७/२०१९ रोजी वार शनिवार वेळ 8:30 ते 12 वाजेपर्यंत राबविण्यात आला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.