बीड: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचे पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पाटोदा:गणेश शेवाळे― पीक विमा भरण्यासाठी शेतकरी धावपळ करत असुन शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामधेच काल कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयातून सातबारा मिळेना यामुळे कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी संतापलेल्या शेतकर्‍यांना सोबत घेऊन पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठुन खालील मागण्यासाठी धरणे आंदोलन चालू केले. पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईनचा सातबारा स्वीकारण्यात यावा. तलाठ्यांना मूळ सज्जावर थांबण्याचे आदेश देण्यात यावे यासह ईत्यादी मागण्यासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे विष्णुपंत घोलप, चक्रपाणी जाधव, राहुल बामदळे,गोविंद बामदळे, लक्ष्मण भाकरे,बाळू खाडे यांच्यासह शेकडो शेतकरी धरणे आंदोलनाला बसले होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.