औरंगाबाद: शेतात काम करणाऱ्या पती पत्नीवर बिबट्याचा हल्ला,दोघे गंभीर जळगावला रवाना,सोयगाव तालुक्यातील घटना

सोयगाव दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―शेतात निंदनीचे काम करणाऱ्या पती-पत्नीच्या जोडप्यावर बांधावरील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने जोरदार हल्ला चढवून दोघांना लोळविले,दरम्यान पत्नीला बिबट्याने कवेत धरल्याचे लक्षात येताच पत्नीने बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीला सोडविताच बिबट्याने डाव मारून पुन्हा पतीला जबड्यात धरल्याने मोठी खळबळ उडाली होती.हि घटना रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कवली ता.सोयगाव शिवारात घडली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे.

कवली ता.सोयगाव शिवारात भारत हरिचंद चव्हाण(वय ३०)आणि मनीषा भारत चव्हाण(वय २३)दोघे रा.वरसाडा ता.पाचोरा हे शेतात खुरपणीचे काम करत असतांना शेतीच्या बांधावर गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहिल्यांदा मनीषा चव्हाण हि जवळ येताच तिला कवेत धरले दरम्यान मागून खुरपणी करत येत असलेल्या भारत चव्हाणचं लक्षात हा प्रकार येताच त्याने बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीला सुटका केली परंतु चवताळलेल्या बिबट्याने पुन्हा शिताफीने भारतला जबड्यात धरल्याने पत्नीने आरडा ओरडा केल्यावर जवळच असलेल्या अजमोद्दिन तडवी,मनोज पाटील आणि विष्णू पाटील यांनी बिबट्याशी पुन्हा अर्धा तास संघर्ष करून बिबट्याचं जबड्यात असलेल्या भारतला बिबट्याच्या तावडीतून सोडविले व बिबट्याला हुसकावून लावले.दरम्यान एका बिबट्याशी तिघांनी संघर्ष करून दोघांचे प्राण वाचविले,दरम्यान बिबट्याचं जबड्यात असलेल्या भारतने मिथ्या शिताफीने बिबट्याच्या जबड्यात हात घालून ठेवल्याने बिबट्याला भारतला गिळंकृत करण्यास अपयश आल्याने बिबट्याचं संघर्षात भारत व त्याची पत्नी मनीषा गंभीर जखमी झाले आहे.या घटनेत भारतच्या शरीरावर आणि पायाच्या व हाताच्या मणक्याला गंभीर दुखापत झालेली असून त्याच्या पत्नीला कंबरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.दरम्यान बिबट्याच्या जबड्यात अर्धा तास असलेल्या भारत चव्हाणच्या मानेला व पोटाला गंभीर जखमी करण्यात आले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.