पाचोरा: विविध लोणचे व शॉपिंग फेस्टिवलला उत्तम प्रतिसाद

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पाचोरा कृष्णकली प्रतिष्ठान आयोजित व भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आबासो.डॉ संजीव पाटील प्रयोजित लोणचे महोत्सव व शॉपिंग फेस्टिवलला पाचोरा वाशीयांनी उत्तम प्रतिसाद दिला पाचोरा येथील स्वामीलॉन्स मध्ये एक दिवशीय विविध वस्तू व लोणचे यांचे विक्रीचा स्टॉल चे आयोजन करण्यात आले होते.
मोहोत्सवाचे उद्घाटन जि. प. सदस्य मधुभाऊ काटे (पिंपळगाव गट ) पाचोरा शहराध्यक्ष नंदूबापू सोमवंशी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दत्ताआबा बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी उपस्थित जनकल्याण समिती जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ काबरा ,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आबासो.डॉ संजीव पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप खासेराव निंभोंरीकर व किशोर नरेराव निभोंरीकर कृष्णराव जाधव निभोंरीकर अमोल पाटील गोराडखेडा स्वप्नील पाटील शिंदाड व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीटिंग निमित्त मुंबई येथे गेल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष आबासो.डॉ संजीव पाटील यांनी दूरध्वनीद्वारे सदिच्छा दिल्या. महिला बचत गट व उद्योजक यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात पाचोरा,भडगाव, जळगाव, धुळे,पारोळा येथील कैरी मिरची मशरूम अंबाडी टमाटो यासारखे लोणचे विक्रीस होते याशिवाय विविध चविचा चकल्या हळद आगरबत्ती आकर्षक राख्या इन्स्टंट पीठ चटण्या केळी पीठ विविध प्रकारचे कव्हर व पिशव्या विक्रीस उपलब्ध होते पाचोरा वाशीयांनी या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद दिला प्रदर्शनात आकर्षक सेल्फी पॉइंट विविध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृष्णकली प्रतिष्ठानच्या डॉ मंजुषा पवनीकर, संजीवनी तायडे,कल्याणी देशपांडे यांनी परिश्रम घेतले.
या महोत्सवाला भाजपा जिल्हाध्यक्ष आबासो.डॉ संजीव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.