बीड: रोटरी क्लबच्या मोतीबिंदु व शञ्यक्रिया शिबीराला पाटोदेकरांचा मोठा प्रतिसाद

रोटरी क्लबचे २२ वे शिबीर संपन्न आतापर्यंतच्या शिबीरात ११००+ रुग्णावर शस्त्रक्रिया तर ३५०० रुग्णांनी घेतला सहभाग

पाटोदा:गणेश शेवाळे―आनंद क्लॉथ सेंटर व आनंद ऋषीजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब आयोजित दरमहा होणारे मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया २२ वे शिबीर रविवारी संपन्न झाले.आत्ता पर्यंतच्या शिबिरात आकराशे रुग्णांच्या तपासनीसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलीतर पस्तीसशे रुग्णानी सहभाग घेतला या रविवारी झालेल्या मोफत मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात एकूण १०३ रुग्णांची तपासणी झाली.तर २२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नगर येथील आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे रवाना केले आहेत.आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथील टीमने रुग्णांची तपासणी केली तर रोटरी क्लबचे वसंतलाल गुगळे, महादेव सुरवसे,आतुल शिंदे,सुरेखाताई खेडकर व रोटरी कल्ब सर्व सदस्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिक्षम घेतले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.