पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन

परळी:आठवडा विशेष टीम― ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा परळी च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय परळी येथे दि. 23 ते 28 जुलै 2019 या दरम्यान भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा तसेच उपजिल्हा रुग्णालयात नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी व भाजयुमोच्या परळी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस दिनांक 26 जुलै 2019 रोजी अनेक सामाजीक उपक्रमांनी साजरा होत आहेे.या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व भाजयुमोच्या परळी शाखेच्या वतीने भव्य मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात हर्निया, हायड्रोसिन, स्तनाच्या गाठी, गर्भपिशवी आजारासंबंधी तपासणी, सोनोग्राफी पोटाची, गर्भाशयाची,स्त्रियांचे आजार,गरोदर अतिजोखमीच्या मातांची तपासणी, अपेंडिक्स, गर्भाशयाची पिशवी काढणे व इतर छोट्या शस्त्रक्रिया तपासणी, रक्तदान शिबीर आदीसह आर्युवेदाबद्दल मार्गदर्शन व योगाचे महत्व समजावून सांगणे असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक परळी डॉ. रामेश्वर लटपटे, डॉ. केंद्रे, डॉ. भरत मुंडे, डॉ.गंजेवार डॉ. जाधव, डॉ. रंजना घुगे, डॉ. सविता मुंडे, डॉ. घोळवे, डॉ. शिरसाट आदी तज्ञ डॉक्टर या शिबीरात सहभाग नोंदवणार आहेत. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी व नागरिकांनी या रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.