आष्टी मतदारसंघातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्याचा आमदार करा―चांगदेव गीते

पाटोदा:आठवडा विशेष टीम―पाटोदा येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आष्टी मतदार संघाकडून चांगले गीते वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून इच्छुक आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते ते बोलताना म्हणाले की मी एक सर्वसामान्य माणूस आहे जर सर्वसामान्य माणसाच्या जीवावर आमदार होता येत असेल तर घराणेशाही भांडवलशही वालेच आमदार होतात तर सर्वसामान्य माणूस का आमदार होऊ शकत नाही ही जबाबदारी सर्वसामान्यांची आहे मी कोऱ्या कागदावर लिहून देतो की एक रुपयाचाही देखील भ्रष्टाचार करणार नाही आमदारांचे एक लाख साठ हजार पगार आहे तो मी तीस हजार रुपये घेऊन एक लाख तीस हजार रुपये सर्वसामान्य गोरगरीब साठी खर्च करेल माझा घरातील नातेवाईक कुठलीही ही निवडणूक लढवणार नाही प्रत्येक गावात एकदा तरी मी भेट देईल तहसील ग्रामपंचायत सर्व शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील आज जो सर्वात मोठा प्रश्न बेरोजगाराचा व त्यांचा विवाहाचा प्रश्न यासाठी प्रमाणिक प्रयत्न करून वधू-वर परिचय मेळावे चे आयोजन केले जाईल. बँकांकडून सुशिक्षित बेरोजगारांना अर्थ सहाय्य करून त्यांना रोजगार उपलब्ध केला जाईल .एमआयडीसी सुरू करून छोटे-मोठे उद्योग मतदार संघात आणले जातील व त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल असे ते बोलताना म्हणाले, शासकीय प्रत्येक कर्मचारी शासकीय कार्यालयात हजर राहावे यासाठी प्रत्येक कार्यालय सीसीटीव्ही कॅमेरे व थंब याची सोय करून गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील व कर्मचारी देखील कार्यालयात वेळेत हजर राहतील .एक वेळ सर्वसामान्य माणसाला संधी द्या मी कुठलीही मतदार संघात अडचण येणार नाही व तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही याची मी हमी देतो ,व कुठलाही एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार करणार नाही मी स्वतः ज्ञानेश्वरी ,भगवत गीता व माझ्या आई-वडिलांचे डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की एक रुपयाचा देखील मी भ्रष्टाचार करणार नाही यासाठी मतदारसंघातील सर्व जनतेने एक वेळ या सर्वसामान्य व्यक्तीला संधी द्यावी अशी त्यांनी यावेळी विनंती केली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.