सोयगाव:पिकविमा मुदतवाढीसाठी संभ्रम,महसूल विभागाला वाढीचा आदेश तर बँकांना मात्र कोणत्याही सूचना नसल्याने गोंधळ

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―खरीप हंगाम पिकविम्याबाबतच्या अंतिम मुदतीच्या दिवशी(ता.२४)जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला पीकविमा वाढीबाबत(ता.२९)पर्यंत मुदतवाढ दिल्याच्या सूचना बुधवारी दुपारी दिल्या,परंतु याबाबत राष्ट्रीयकृत बँका,जिल्हा बँका आणि कृषी विभागाला कोणत्याही सूचना नसल्याचे उघड झाल्याने प्रशासनात संभ्रम आणि शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्याने बुधवारीच अंतीम मुदत असल्याचे समजून शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी मोठी लगभग केली होती.
खरीप हंगामाचा पीकविमा भरण्याची बुधवारी अंतिम मुदत होती,परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र अचानक मुदतवाढीच्या सूचना प्राप्त झाल्याने महसूल विभाग बिनधास्त झाला होता,परंतु बँका आणि कृषी विभागाला मात्र कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे समोर आल्याने मात्र पीकविमा वाढीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्याने ऐकावे कोणाचे हा प्रश्न उभा राहिला होता.दरम्यान महसूल विभागाला प्राप्त आदेशात स्पष्ट म्हटले आहे,खरीप हंगाम पीकविमा भरण्यासाठी(ता.२९)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून हि मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती वाढवून शेतकऱ्यांना याबाबत तातडीने सूचना देण्यात याव्या,त्यामुळे या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सोयगावला महसूल विभागाने तयारी पूर्ववत ठेवली असतांना मात्र बँकांकडून अंतिम आकडेवारी मिळविण्याची तयारी चालू असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे.बँका सोबतच कृषी विभागही या वाढीच्या सूचनेबाबत अनभिज्ञ असल्याने पिक्विम्याबाबत सोयगावला गोंधळ उडाल्याने रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा उभ्या असल्याचे चित्र निर्माण झाले होते,दरम्यान एकीकडे बँका आणि कृषी विभाग यानिर्णयबाबत अनभिज्ञ असतांना दुसरीकडे मात्र महसूल विभागाच्या वतीने पीकविमा वाढीच्या काळात शेतकऱ्यांना सातबारा मिळावा यासाठी पुन्हा तलाठ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिल्या आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.