सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर पावसाचा ताण

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यात पावसाने चौथ्या दिवशी खंड पाडल्याने कपाशी पिकांसह इतर खरीप पिकांवर पावसाचा ताण पडल्याने कपाशी पिकांची पाने आकसत आहे,दरम्यान यावर उपाय योजनासाठी शेतकरी अनभिज्ञ असल्याने सोयगाव तालुक्यातील २९ हजार हेक्टरवरील कपाशीचे पिके धोक्यात आली आहे.
सोयगाव तालुक्यात तूर्तास गुलाबी बोंडअळींच्या धोक्याबाहेर असलेली कपाशीचे पिके पावसाअभावी धोक्यात आली आहे,पावसाने चौथ्या दिवशी खंड दिल्याने कपाशी पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम दिसून येत आहे,त्यातच पावसाची उघडीप खरीप पिकांसाठी धोक्याची घंटा असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.मका पिके किडींच्या विळख्यात सापडली असतांना दुसरीकडे कपाशी पिकांना पावसाची गरज भासत आहे.त्यामुळे खरीप हंगाम दुहेरी कचाट्यात सापडला असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाल्याने सोयगाव तालुक्यातील ४१७२८ हेक्टर वरील खरीप संकटात सापडला आहे.