मुंबईच्या मालाड मध्येही मराठा प्रतिष्ठानचा वृक्ष लागवड उपक्रम

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सामाजिक उपक्रमात अव्वल ठरलेल्या मराठा प्रतिष्ठानच्या खुणा मुंबईचं मालाड मध्येही उमटल्या असून आदिवासी भागात मालाड महाराष्ट्र शासन उपनिबंधक सहकारी संस्था,दत्तसेवा सहकारी पतपेढी आणि मराठा प्रतिष्ठानचं वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वृक्षारोपानात आदिवासी बांधवांनी सहभाग घेत मराठा प्रतिष्ठानचं उपक्रमाला साद दिली आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा प्रतिष्ठानचे रोपटे वृक्ष लागवड मोहिमेतून मुंबईचं धाराशिव आणि मालाड भागातही रुजविले असून या भागातील आदिवासी बांधवांची अपेक्षापुरती करण्याचा संकल्प करून वृक्ष लागवड मोहीम संपन्न केली.यावेळी संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे,सहायक निबंधक काकड साहेब,दत्तसेवा पतपेढीचे अध्यक्ष आनंद महींडले,तलाठी मनीषा नागरे,गणेश भाऊ,संजय पाटील,समाधान बावस्कर, सागर शिंदे, व दादाच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचे काम करणाऱ्यां सौ.सविताताई गव्हांडे,मुंबई च्या भावी नगरसेविका सौ. रंजानाताई काळे हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली या मोहिमेत तब्बल हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.