पाटोदा तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढला पण त्यांना हक्क व अस्मिता कधी मिळणार―दत्ता हुले

पाटोदा:आठवडा विशेष टीम―“मुलगी नको वंशाला दिवा पाहिजे”म्हणून गेल्या सात-आठ वर्षाखाली बीड जिल्ह्याचा एक मुद्दा देशभर गाजला तो म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या,जिल्ह्यातील काही नेत्यांत्या व शासकीय अधिकारी यांच्या सहमतीने हा कारभार जिल्ह्यातील काही रुग्णालयात सुरू होता,पण जिल्ह्यात बीड,परळी शहरामध्ये स्त्री जातीचे अभ्रक संपले ह्या कारभारातील सर्व लोकांची साखळी सापडली व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले.यामुळे शासन व सामाजिक स्थरातून स्त्रीभ्रूणहत्येवर प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. लोकांची मानसिकता बदलली व या सर्व बदलामुळे आज पाटोदा तालुक्याच मुलींच्या जन्मदराच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बालविकास विभागाने २०१७ ला दिलेल्या यादीनुसार मुलींचा जन्मदर हा १००० मुलांमागे ९२७ मुली एवढे प्रमाण होते,२०१८ मध्ये हेच प्रमाण १०००मुलांमागे ९४१ असे झाले व त्यानंतर त्यानंतर एका वर्षात हेच प्रमाण दरहजारी मुलांमागे ९४५ असे झाले आहे,हा बद्दल नक्कीच कुठेतरी सकारात्मक आहे.
पाटोदा तालुक्यातील मुलींना त्यांचे हक्क त्यांचा सन्मान व अस्मिता आहे का.? म्हटल्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते,कारण हा तालुका मुळातच ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो, त्यामुळे नक्की मुलींच्या साक्षरतेचे प्रमाण येथे कमी आहे,कारण मुलींना कुठेतरी १०-१२ वी पर्यंतचे शिक्षण येथे दिले जाते काही प्रमाणातच मुली उच्च शिक्षण घेतात, कारण तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे महाविद्यालयीन शिक्षण भेटत नाही,जर खेडेगावातील मुलींना कॉलेजला जायचे म्हटले तरी आज तालुक्यात त्यांच्या अस्मितेचा व सुरक्षतेचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे पालक मुलींच्या शिक्षणार जास्त लक्ष केंद्रित करत नाही,खेडेगावातील मुलींचे तर सर्रासपणे १६-१७ व्या वर्षी बालवयात विवाह केला जातो, कारण जर मुलीला पुढचे शिक्षण द्यायचे म्हटले तर तिला तालुक्यातील व शाळा कॉलेजमध्ये उनाड मुलांच्या त्रासाला बळी पडावे लागते, अन्यथा आई वडील जर मजुरी अथवा उसतोडणीला जात असतील तर त्या मुलीच्या राहण्याची व संरक्षनाची सोया होत नाही, म्हणून पालक लग्नाची घाई करतात.
आज पाटोदा तालुक्यात मुलींच्या जन्मदाराचा टक्का जरी वाढला असला तरी सुद्धा त्यांचा हक्क व अस्मिता त्यांना आज मिळत नाही, खास करून राज्य शासनाच्या अस्मिता योजनेपासून पाटोदा तालुक्यातील किशोरवयीन मुली व ग्रामीण भागातील महिला वंचित आहेत, राज्य शासनाने २०१८ ला महिला दिनाच्या निमित्ताने किशोरवयीन मुली व ग्रामीण महिला यांची अस्मिता जपण्यासाठी व त्यांचे हक्क त्यांना मिळण्यासाठी माझा हक्क माझा गौरव या शीर्षकाखाली अस्मिता योजना सुरू केली होती व त्या माध्यमातून किशोरवयीन मुली व ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळी व त्यानिमित्ताने घ्यायचे शारीरिक स्वस्थ व अल्पदरात सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून त्यांना आथिर्क आधार मिळणार होता, व या योजनेचा जनजागृती रथ राज्यभर फिरणार होता, व या योजनेच्या माध्यमातून मुलींना मार्गदर्शन व अल्पदरात मासिक पाळीच्या काळात लागणारे सॅनिटरी पॅड नॅपकिन अल्प दारात मिळणार होते,बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात आला पण या योजनेपासून पाटोदा तालुका वंचित राहिला आहे, तालुक्यातील खाजगी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक म्हणत आहेत की जिल्हा आरोग्य विभागाने आम्हला परिपत्रक आले नाही,पण आज तालुक्यातील खेडेगावातील व पाटोदा शहरालगत असणाऱ्या वाडी-वस्ती वरील मुली सायकलवर शाळा व खाजगी क्लासेला येत आहेत, किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान वयानुसार होणाऱ्या शारीरिक बदलामुळे पोटदुखी व अन्य आजार त्या काळात उद्भवतात व त्या काळात त्यांचे शरीर कमकुवत झालेले असते त्या काळात त्यांचे आरोग्य व स्वछता यांकडे लक्ष न दिल्याने तालुक्यातील मुलींना भविष्यात आई बनण्यावेळी नाहक त्रासाला बळी पडावे लागत आहे.
त्यामुळे अस्मिता योजनेचा जनजागृती रथ व मुलींना मासिक पाळीचे मार्गदर्शन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशी खंत पाटोदा तालुक्यातील शैक्षणिक, वैचारिक व अन्य निगडित क्षेत्रात आक्रमक असणारा युवक इंजि.दत्ता हुले याने व्यक्त केली आहे,मुलींना त्यांचे हक्क देण्याचे व अस्मिता टिकण्याचे आव्हान प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.