औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव:पंचायत समितीच्या मैदानात पाण्याने घातला वेढा,आरोग्याचा प्रश्न निर्माण

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव परिसरात झालेल्या भीज पावसाने पंचायत समितीच्य मैदानाला साचलेल्या पाण्याने गुरुवारी वेढा घातल्याने,पंचायत समितीच्या मैदान परिसरात पाणीच पाणी साचल्याने या मैदानाच्या भोवताली असलेल्या शासकीय कार्यालयांसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.दरम्यान या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मात्र कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नसल्याने मैदानात पाण्याचे तळे साचल्याचे सर्वत्र दिसून आले होते.
सोयगाव पंचायत समितीच्या मैदानाला साचलेल्या पाण्याने वेढा घातल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती,दरम्यान पंचायत समितीचे मैदान आठवडे बाजाराचे त्जीकन असून या मैदान परिसराला लागुनच तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषदेचे विश्राम गृह आदींसह जिल्हा परिषदेच्या तीन शाळा असून या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीला तोंड देवून शाळेत प्रवेश करावा लागतो,दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वारातच भले मोठे तळे साचले आहे.त्यामुळे शाळेच्या परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने साथीचं आजारांनी या विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.संबंधित विभागाने तातडीने आय साचलेल्या पाण्याचा विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

मोकाट डुकरांचा मुक्तसंचार

दरम्यान साचलेल्या पाण्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असल्याने या भागात मोकाट डुकरांचा मोठा मुक्तसंचार सुरु झालेला असून,सदरील मैदान शहरातील मुख्य भागात जाण्याचे प्रमुख रस्त्याचे केंद्र बनले असल्याने पायी जाणाऱ्या शहरवासीयांनाही या पाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे,दरम्यान या रस्त्यावरून वावरतांना शहरवासीयांना तोंडाला मास्क बांधून जावे लागत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.