पाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाटोदा शहरातील बेदरे व देशमाने यांना मल्हाररत्न पुरस्कार जाहीर

पाटोदा:आठवडा विशेष टीम―राजे मल्हाराव होळकर सामाजिक प्रतिष्ठाण बीड यांच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल राज्यस्तरीय मल्हाररत्न पुरस्कार प्रदान केला जातो, यामद्ये पाटोदा तालुक्यातील दोन व्यक्तिमवाला यावर्षी पत्रकारिता व सामाजिक कामाबद्दल गौरविण्यात आले आहे.
एक रुपयाची किंमत काय असते,हे दाखवून देणारे पाटोदा तालुक्यातील तळमळीने निस्वार्थी समाजकार्य करणारे आजपर्यंत लोकांकडून एक एक रुपया दनपेटीच्या माध्यमातून जमा करून ३५ सायकलचे गरजू विद्यार्थ्यांना मोफत देण्याचं काम ते करत आहेत, या कामाची पोहच पावती म्हणून दैनिक झुंजार नेताचे पत्रकार दत्तात्रय देशमाने यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे..!

पत्रकारीता क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय मल्हाररत्न, पुरस्कार पाटोदा तालुक्यातील दैनिक पुढारीचे पत्रकार महेश बेदरे यांच्या अभ्यासु, निर्भीड व सामाजिक भान ठेवून पत्रकारिता क्षेत्राला धक्का न लागता स्वच्छ प्रतिमा असणारे पत्रकार म्हणून त्यांच्याकडे आज पाहिले जाते.
दोन्ही व्यक्तिमवाला सोशल मीडियावर व प्रत्यक्ष भेटून मित्र परिवार शुभेच्छा देत आहेत.या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. जयदत्तअण्णा क्षीरसागर, आ.रामरावजी वडकुते व मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे होणार असुन या कार्यक्रमास सर्व मित्रपरीवार जेष्ठ, आप्तेष्ठ , सहकारी, मार्गदर्शक सर्वानी अगत्याने नक्की येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती पाटोदा तालुक्यातील दोन्ही समानार्थी पत्रकार यांनी केली आहे .

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.