कालचा दिवस फक्त पंकजाताईचा…!

बीड:राम कुलकर्णी―बीड जिल्ह्याच्या राजकारणात कालचा दिवस जणु काही फक्त एकाच राजकिय नेतृत्वाचा होता. तो म्हणजे ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे. सद्य:स्थितीत अमेरिकास्थित असतानाही वाढदिवसा निमित्त संपुर्ण जिल्ह्यात बहरून आलेले प्रेम आणि नेतृत्व इथे नसताना कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी घेतलेले कार्यक्रम, सोशल मिडिया, फेसबुक, व्हॉटसअप, विविध वर्तमानपत्रे आणि ठिकठिकाणी लागलेले बॅनर हे सारं पाहता एक दिवस हा फक्त पंकजाताईचा होता.घराघरांत, ग्रामीण भागात, शहरात, चौका चौकात एकच चर्चा कानावर पडत होती ती म्हणजे पंकजाताईचा वाढदिवस. जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या राजकारणात फक्त एका नेतृत्वासाठी जिल्ह्याच्या लोकांचा दिवस हे केवळ स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या बाबतीत लोकांनी पाहिलं. मात्र त्यांच्यानंतर हाही विक्रम त्यांच्याच लेकीच्या नावावर मोडल्या जावु शकतो. त्या म्हणजे पंकजाताई.परदेशात्ा असताना जिल्ह्यातील लोकांचे प्रेम आणि नेतृत्वाबाबतीत असलेली सहानुभुती हा पण अनुभव काल काना कोपऱ्यात दिसुन आला.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री, पदाधिकारी यांच्या शुभेच्छा, अभिष्टचिंतन तर होतच.मात्र ज्याप्रमाणे मुंबईत एखादा दिवस मुसळधार पावसाचा असतो, क्रिकेटच्या मैदानावर एखादावर दिवस रोहित शर्मा, विराट कोहलीचा असतो.चित्रपटात एखादा दिवस सलमानचा असतो.तसंच काही जिल्ह्याच्या राजकिय चित्रपटात कालचा दिवस फक्त पंकजाताईचा होता.
खरं तर पंकजाताईंना आपला वाढदिवस साजरा करणं मान्य नाही. त्यातही मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सद्या त्या परदेशात आहेत. तेथुनही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना वाढदिवस नको या ऐवजी गोरगरीबांना मदत करा.निराधार लोकांना सहकार्य करा अशा प्रकारच्या सुचना दोन दिवस अगोदरच दिल्या होत्या.मात्र आपलं नेतृत्व इथे नसताना संपुर्ण जिल्ह्यानं काल एक राजकारणात आगळावेगळा चमत्कार पाहिला. या जिल्ह्यात एक दिवस गोपीनाथराव मुंडेंचा असायचा. ते जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाले आणि त्यांचेही वाढदिवस.मात्र तदनंतर त्यांचीच लेक ज्यांनी बीड जिल्ह्यातील अठरापगड जातीधर्माच्या ऱ्हदयावर जागा मिळवली. स्वकर्तृत्वाने अस्तित्व निर्माण करून ज्यांनी केवळ लोकांचं प्रेम मिळवण्याचा कारखाना काढला.त्याच पंकजाताईच्या भोवती कालचा बीड जिल्ह्याचं संपुर्ण दिवस फिरत राहिला.गतवर्षी पंकजाताईने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव परळीत वाढदिवस साजरा केला. वास्तविक पाहता यंदाही जर इथे असत्या तर आज संपुर्ण जिल्ह्यात सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे कार्यक्रम घेता आले नसते. कारण त्यांच्याभोवती गर्दीचा लोंढा लोकांचा असतो. कदाचित त्यांनी घेतलेला निर्णय खरं तर चांगलाच राहिला.कारण या निमित्ताने काल दिवसभर बीड जिल्ह्यात परळी, अंबाजोगाई, केज, धारूर, वडवणी, माजलगाव, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई आणि बीड या तालुक्यात धुमधडाक्यात कार्यक्रम झाले. कार्यक्रम सामाजिक बांधिलकीचे होते. परळीत अनेक ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम झाले तर गिरवलीत गोरगरीबांना रॅशन वाटपाचा कार्यक्रम झाला. केजात आ.संगिताताई ठोंबरे यांनी प्रशासन आपल्या दारी या अंतर्गत भव्यदिव्य उपक्रम घेतला. एकुणच रेलचेल याच्ा नेतृत्वाच्या कार्यक्रमाची होती. काल सकाळी वर्तमानपत्र उघडल्याबरोबर साऱ्या वर्तमानपत्रात केवळ पंकजाताई.इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया, पिं्रट मिडिया एवढंच नव्हे तर फेसबुक, व्हॉटसअप, मेल,जीमेल या सर्व अत्याधुनिक साधन सुविधावर पंकजाताईंना शुभेच्छा देणारेच संदेश होते. ग्रामीण भागात, तालुका स्तरावर प्रमुख चौक त्यांच्या बॅनरने दाटुन आले होते. गावागावात, रस्त्यारस्त्यावर, गल्लीबोळात चर्चा होती ती फक्त त्यांच्या वाढदिवसाची.ग्रामदैवताला महाआरती असेल किंवा दर्ग्याला चादर चढवायची असेल.कुठे रक्तदान असतील तर अनेक ठिकाणी रूग्णंाना फळे वाटपाचा कार्यक्रम हे सारं केवळ परळी-अंबाजोगाईतच नव्हतं तर बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेवुन आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. कधी कधी एखाद्या राजकिय नेतृत्वावर लोक जीवापाड प्रेम का करतात?हा प्रश्न पडतो.कारण गोपीनाथराव मुंडेंवर जिल्ह्यातील लोकांनी एकेरी जीवापाड प्रेम केलं आणि त्यापेक्षा अधिक त्यांच्या लेकीवर जीवापाड प्रेम लोक करतात. कदाचित या कारणमिमांसा जर केली तर मागच्या पाच वर्षात पालकमंत्री म्हणुन त्यांनी जिल्ह्यात केवळ विकासाचे राजकारण केले. वंचित, उपेक्षित, समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवुन देण्याचं काम केलं. बहुजन हिताय, बहुजन सुखाय सर्वांना सोबत घेवुन विकासाच्या प्रगतीत पाऊल टाकलं. या शिवाय स्वच्छ आणि प्रामाणिक कुठलाही मीपणा नाही. पदाचा गर्व नाही. मिळालेली संधी सामान्य जनतेच्या चरणावर ठेवुन समर्पित आयुष्य केवळ शेवटच्या माणसासाठी आहे हे त्यांनी दाखवुन दिलं. पालकमंत्री म्हणुन विकासाचा विक्रम प्रस्थापित केला. सर्वांना समान विकास निधीचं वाटप केलं. गाव तिथं विकास निधी देताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नाही. विरोधकांनाही कधी सत्तेचा गैरवापर करत डिवचलं नाही.म्हणुन महाराष्ट्राच्या राजकारणात एक नविन नेतृत्वाचा तारा या बीड जिल्ह्यातुन नेतृत्व करतो आणि त्यांचं कर्तृत्व पाहुन लोक प्रेम करू लागले. कदाचित हाच परिपाक म्हणुन काल दिवसभर त्या जिल्ह्यात नसताना जनतेनं व्यक्त केलेलं प्रेम ही खऱ्या अर्थाने नेतृत्वाच्या कामाची पावती होय. वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवस फक्त पंकजाताईचा हे अगदी स्वकियांचे अनुयायी निश्चितच सांगतील.मात्र जिल्ह्यातील विरोधकांनाही कालचा दिवस मान्यच करावा लागेल.प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मिळालेल्या प्रेमाचा स्विकार स्वत: पंकजाताई माध्यमातुन पाहत होत्या. खरं तर लोकसभा निवडणुकीत डॉ.प्रितमताई मुंडेंना मिळालेलं यश आणि त्यामागे या नेतृत्वाचा असलेला करिश्मा त्याचीही उकल काल दिवसभरात झाली. कुणी काहीही म्हणा नेतृत्व जनतेच्या भल्यासाठी काम करत असेल तर समाजातील शेवटचा माणुस त्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो जे काल संपुर्ण जिल्ह्यानं पाहिलं. राजकारणात अलीकडच्या काळात स्वार्थपणा खुप आलेला आहे. आपला नेता असो किंवा कुणी असो.कार्यकर्ते पण नाटकीपणाने वागतात. इथे मात्र आगळंवेगळं आहे. एक तर गोपीनाथराव मुंडेंवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे आणि लाखो अनुयायांना त्यांचा चेहरा लेकीच्या चेहऱ्यात दिसतो. काल जेव्हा लोकांनी शुभेच्छा दिल्या.त्या देताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर साहेबांचा चेहराच दिसत होता. हे अगदी प्रत्यक्ष वर्णन आहे. केवळ लिखाण म्हणुन नव्हे.अनुभवव्रत चित्र आहे. बाकी काही असले तरी बीड जिल्ह्यातील माय-बाप जनतेने कालचा शुक्रवार हा दिवस केवळ एकाच राजकिय नेतृत्वाचा होता हे सामान्य जनतेने जवळुन पाहिलं. पाच वर्षात त्यांनी घेतलेली भुमिका, राजकिय बदल घडवत असलेली संस्कृती, परखड आणि स्पष्ट स्वभावाचे राजकारण आणि केवळ विकास आणि विकास.त्यामुळेच जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमात वर्तमान परिस्थितीत प्रचंड वाढ झाली.ज्यातुन प्रितमताईंचा विजय याच प्रेमाचा परिपाक होता आणि नेतृत्व जिल्ह्यात नसताना एक दिवस फक्त पंकजाताईचा हा विक्रम त्यांच्याच नावाने बीड जिल्ह्याच्या राजकारणात तयार झाला.अशा या लाडक्या नेतृत्वाचं भविष्य उज्वल व्हावं ही आमचीही प्रार्थना.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.