सोयगाव,ता.२७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव परिसरात झालेल्या पावसाने शनिवारी सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावर झाडे आडवी पडल्याने जळगाव जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पडलेली रस्त्यातील झाडे दूर केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यावर झाडे पडल्याने मराठवाड्यातून खानदेशात जाणारा रस्ता ठप्प झाल्याने प्रवाशांचे शनिवारी मोठे हाल झाले दरम्यान सोयगाव-शेंदुर्णी हा रस्ता निम्मा औरंगाबाद आणि निम्मा जळगाव बांधकाम विभागाचा असल्याने दोन्ही जिल्ह्याच्या सार्वजनिक विभागाकडून उशिरापर्यंत कर्मचारी न आल्याने अखेरीस गरज असलेल्या प्रवाशांनी हातांनी झाडे दूर करून वाहनांना वाट मोकळी करून दिली होती.चार तास या रस्त्याची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मात्र पावसात भिजत रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले.
मराठवाड्यातून खानदेशाला जोडणारा एकमेव रस्ता-
मराठवाड्यातून खानदेशाला जोडणारा एकमेव रस्ता म्हणून ओळख असलेला सोयगाव-शेंदुर्णी हा रस्ता बंद पडल्याने दोन्ही भागातील प्रवाशांना एकीकाद्फुन दुसरीकडे जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.