बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीसामाजिकहेल्थ

लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची मुजोरी कायम , जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचा हलगर्जीपणा तक्रार दाखल करण्यात येवुनही कारवाई नाही–डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश येथिल वैद्यकीय अधिकारी डॉ.रकटे & डॉ.राऊतमारे यांच्याविषयी ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.या वेळेवर आरोग्य केंद्रात येत नाहीत, सतत गैरहजर राहिल्याने परिचारिका रूग्णांना तपासणी व औषधोपचार करतात.दि. ११ मार्च बुधवार रोजी १० वा.डां.गणेश ढवळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते.रुग्णांची तपासणी व औषधोपचार परिचारिका करत होत्या.याविषयी डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी यांची लेखी तक्रार केली होती व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता तेव्हा त्यांनी स्वत: वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोलतो म्हणाले होते

तपासणी साठी आलेल्या रुग्णांना गेटच्या बाहेर काढले

लिंबागणेश ग्रामपंचायतीच्या हद्दीत भाळवणी ते लिंबागणेश रस्ता कामावर ५० मजुर काम करतात. त्यातील २ मजुर काल लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी साठी गेले असता त्यांना न तपासता गेटच्या बाहेर काढले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कासट यांनी लेखी तक्रारी नंतरही कारवाई न केल्याने वैद्यकीय अधिकारी यांचा मुजोरी पणा वाढला आहे.
दि. १३ एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी & तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी तक्रार देऊनही कारवाई न केल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गुत्तेदाराने जबाबदारी सांभाळली नाही

भाळवणी ते लिंबागणेश या रस्त्यावर काम करत असलेले ५० मजूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत.४ महीन्यापासुन काम करत आहेत. या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुत्तेदार एम.टी.मस्के कन्स्टक्शनचे मालक मदन मस्के यांची आहे.कोरोना आजाराविषयी माहिती देणं ही त्यांची जबाबदारी आहे.परंतु ती त्यांनी पार पाडली नाही.

माणुसकीच्या नात्याने औषधोपचार करावेत― डॉ.गणेश ढवळे

बाहेर जिल्ह्यातील पोटापाण्यासाठी आलेल्या मजुरांची तपासणी न करताच गेटच्या बाहेर काढणे हे वैद्यकिय व्यवसाय नव्हे तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.
लेखी तक्रार दाखल करण्यात येवुनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई न करणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकृष्ण पवार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कासट यांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना. उदृधवजी ठाकरे ,ना. आरोग्य मंत्री राजेश टोपे , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ ढवळे यांनी सांगितले.

Back to top button