सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेल्या वेताळवाडी धरणाने शंभरी गाठल्याने ओव्हरफ्लो होवून शनिवारी दुपारनंतर धरणातील पाणी ओसंडून वाहू लागल्याने शहराच्या सोनानदिला पहिला पूर आला होता.दरम्यान तालुक्यात पहिल्यांदा शंभर टक्के भरण्याचा वेताळवाडी धरणाने मान मिळविला असून दुसऱ्या क्रमांकावर धिंगापूर धरणाचा जलसाठा अद्याप ७० टक्क्यांवर आलेला असल्याने धिंगापूर वाहण्याच्या स्थितीसाठी अजून दुसऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
सोयगाव तालुक्य पाटबंधारे विभागाची अकरा मोठी प्रकाल्पे असून त्यापैकी एक प्रकल्प निम्मा पावसाळा संपत आल्यावर भरला आहे.धिंगापूर भरण्यासाठी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.त्यामुळे तूर्तास सोयगाव तालुका पाणी टंचाई भोवरयातून बाहेर निघाला असला तरीही बनोटी मंडळात धरणे भरण्याची प्रतीक्षा आहे.दरम्यान वेताळवाडी धरणाच्या सांडव्याचे पाणी हिरवळीतून मार्गस्थ झाले असतांना शहराची सोनानदी धो-धो वाहत जळगाव जिल्ह्याकडे मार्गस्थ झालेली आहे.त्यामुळे शहरातून सोनानदीचा मोठा थाट दिसत आहे.