सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―मराठा आरक्षणाच्या शासनाच्या धोरणाविरुद्ध भूमिका घेवून आरक्षणाच्या विरुद्ध वक्तव्य प्रकरणी आणि नाहक मानसिक त्रास प्रकरणी तालुका अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांची भेट घेवून कारवाईची पुन्हा मागणी केली आहे.दरम्यान अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेले निवेदन बाबत अद्यालप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सेविका संतप्त झाल्या होत्या.
सोयगावच्या प्रभारी महिला प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी सेविकांच्या बैठकीत मराठा आरक्षणाचं शासनाच्या निर्णया विरुद्ध वक्तव्य करून मराठ्यांना आरक्षण देण्याची शासनाची काय गरज असे वक्तव्य केले होते त्याच बरोबर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना मानसिक त्रास देवून त्यांची नाहक चौकशी करण्याचा या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सपाटा धरला होता.अंगणवाडीच्या घालून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अंगणवाडीत जावून चौकशी करण्याचा या प्रकल्प अधिकाऱ्यांचा त्रास असल्याचे सेविकांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.परंतु जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्यान विभागाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांची भेट देवून पुन्हा होणाऱ्या त्रासाचे कथन केल्यावरून पुष्पा काळे यांनी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यावर कारवाईचे आश्वासन दिले दरम्यान या तथाकथित प्रकल्प अधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य करून या समाजाला नौकर्या कशाला पाहिजे शासनाच्या आरक्षणाच्या धोरणाविरुद्ध रणशिंग फुंकल्याने सोयगाव तालुक्यात आठवडाभरापासून गोंधळ उडाला आहे,परंतु अद्यापही जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्यान विभागाकडून अद्यापही कोणतीही कारवाई होत नसल्याने तालुक्यात सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.या प्रकल्प अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून चौकशीअंती त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन कचऱ्याच्या डब्ब्यात असल्याचा संशय-
दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या सेविकांचे निवेदन संबंधित विभागाने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याच्या संशयावरून शुक्रवारी सेविकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पा काळे यांची भेट घेवून कारवाईचे साकडे घातले आहे.
सोयगावच्या प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधातील निवेदन प्राप्त झालेले आहे,त्यावर चौकशी समिती नेमण्यात येवून चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल.
प्रसाद मिरकले
उपमुख्य कार्यकारी अधिकारी.