सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
मी नवमतदार विकासाचा भागीदार या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात नवीन मतदार नोंदणी व भाजपा सदस्य नोंदणी अभियान शुक्रवारी आमखेडा गटात जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांच्या नेतृत्वात संपन्न झाले.आमखेडा गटातील जंगलातांडा गावातून शुभारंभ झालेल्या या अभियानाचा तेरा गावात अभियान राबविण्यात आले यावेळी पंचायत समितीचे सदस्य संजीवन सोनवणे,नगरसेवक कैलास काळे,तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण,सुनिल पाटील मिरकर,मंगेश सोहणी,
शहरध्यक्ष सुनिल ठोंबरे,बद्री राठोड,विशाल गिरी,नंदलाल पवार,रानिदास चव्हाण,मुन्ना ढगे,रवींद्र पाटील,देवेंद्र तेलंग्रे,गणेश देशमुख,राहुल गिरी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.