सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावच्या वेताळवाडी धरणापाठोपाठ जरंडीचे धिंगापूर धरणही ८२ टक्क्यांवर पोहचल्याने सोयगावसह पंधरा गावांच्या पिण्याचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला असून रिमझिम पावसावर धिंगापूर धरणाची मदार अवलंबून असल्याचे चित्र आहे.
सोयगावसह तालुकाभर सुरु असलेल्या रिमझिम पावसावर वेताळवाडी ओव्हरफ्लो झाले असतांना त्यापाठोपाठ धिंगापूर धरणही ८२ टक्क्यांवर पोहचल्याने पंधरा गावांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.दरम्यान धिंगापूर धरणाच्या पाण्याची अवाक असलेल्या डोंगरातील गंगाधारला पाण्याची आवक वाढली नसल्याने या आवक्वर अवलंबून असलेल्या धिंगापूर धरणाला पुन्हा मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.