सातारा:आठवडा विशेष टीम―शिवेंद्रराजे गेल्यामुळे राष्ट्रवादीला काही फरक पडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे.यावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते साताऱ्यामध्ये बोलत होते.
शिवेंद्रराजे गेल्याने काही होणार नाही साताऱ्याची जागा राष्ट्रवादी राखेल,असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.दरम्यान,शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंमुळे पक्ष सोडला नाही,असेही शरद पवार म्हणाले आहेत.