पाटोदा:गणेश शेवाळे― आचानक अंतयाञा दिसलीकी सगळेच जण दचकतात असेच आज पाटोदा शहरात पाहायला मिळाले गुरुवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने खेड्या पाड्यातुन तसेच बाहेर गावावरुन खुप लोक पाटोदाला येतात.यामुळे शहरात मोठी गर्दी जमली होती. यातच आचानकपणे रडण्याचा ओरडण्याचा आवाज व ढोल ताशा वाजत गाजत पोलीस बंदोबस्तात अंतयात्रा कोणाची ? काय झाले आसेन कोणाची अंतयाञा आहे अशी चर्चा पाटोद्यात चांगली जोरदार रंगली या बाबद सविस्तर वृत्त असे की पाटोदा उपविभागियअधिकारी कार्यालयासमोर आज आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. मागिल काही वर्षापासुन पाटोदात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला असुन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणाचाही धाक राहिला नाही. यामुळे गुरुवार दिनांक 01/08/ 2019 रोजी सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड यांच्या नेतृत्वाखाली छञपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीयअधिकारी कार्यालयावर भ्रष्टाचार,दिरगाई, कामचुकार,हाप्तेखोर अधिकारी यांचा प्रतीमापक पुतळा करुण खालील मागण्यांसाठी कुटेवाडी येथील मंदीराच्या भ्रष्ट कामाची चौकशी करुण संबंधितावर गुन्हे दाखल करा,पाटोदा तालुक्यातील गायराण जमीणीचे पोटखराब आहे अशी नोंद करुण गोरगरीब जनतेची अडवणुक करणाऱ्या तहसील मधील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत व नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात यावेत,पाटोदा तालुक्यातील तहसील कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक फेरफार आडवूण धरुण गोरगरीब जनतेचे नुकसान केल्याने अडवणुक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक शासन करण्यात यावे,दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे,शैक्षणिक कर्जासाठी बँकेकडून होणारी अडवणुक थांबून गोरगरीब विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक कर्ज वाटप करावेत व बोंडआळी अतिवृष्टी अनुदान गरीब शेतकऱ्यांना वाटप न करता ज्यांच्या नावावर जमीन नाही अशा लोकांना वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा. या मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर छञपती शिवाजी महाराज चौकातुन भ्रष्टाचार, हाप्तेखोर, दिरगाई,अडवणुक करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतीमापक पुतळ्याची अंतयात्रा शहरात काढुण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दशक्रिया-विधी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड,विष्णुपंत घोलप,सुनील जावळे यांच्या सह अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.