महाराष्ट्र राज्यराजकारणसामाजिक

फर्दापुर गावाचा पाणीप्रश्न उच्च स्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सुटला -आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश

आठवडा विशेष | प्रतिनिधी

सिल्लोड २२ जानेवारी: सिल्लोड सोयगाव विधानसभेतील फर्दापुर या गावाची पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या योजनेचा पाठपुरावा आमदार अब्दुल सत्तार सतत घेत होते. त्यांच्या प्रयत्नाला आज पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्च स्तरीय समितीमध्ये मंजुरी मिळाली आहे. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी फर्दापुर गावाच्या रखडलेल्या योजनेसंदर्भात पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे लक्ष वेधून सदर योजना तातडीने मंजूर करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी सदर योजनेस मंजुरी दिली. मंत्री बबनराव लोणीकर यांनी सदरील योजना मंजूर केल्याने आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांचे आभार मानले व फर्दापुर गावाच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याने समाधान व्यक्त केले.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.