मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले हे शुक्रवार दि.10 मे पासून राज्यात तीन दिवसांचा दुष्काळ दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागात दुष्काळाच्या झळांमुळे शेतकरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार कडून दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान झालेल्या महाराष्ट्र राज्यात निवडणूक आचारसंहिता शिथिल केली आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला होता. राज्यातील विदर्भ; मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा तीन दिवसीय पाहणी दौरा येत्या दि.10 मे पासून ना रामदास आठवले सुरू करणार आहेत.
दि. 10 मे रोजी विदर्भात नागपूर वर्धा आदी जिल्ह्यांतील दुष्काळी भागांचा दौरा केल्यानंतर दि. 11 मे रोजी मराठवाडा विभागातील नांदेड ; लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील दुष्काळी भागांची पाहणी ना रामदास आठवले करणार असून तिसऱ्या दिवशी दि. 12 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न पाणी टंचाई; जनावरांच्या चाराछावणीची व्यवस्था; गावकऱ्यांच्या भेटी घेऊन दुष्काळ निवारणासाठीच्या उपाययोजनांचा अहवाल दुष्काळ दौरा करून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येईल आशी माहिती ना. रामदास आठवले यांनी आज दिली आहे.
0