पाटोदा:आठवडा विशेष टीम― सन-२००४ साला मधील पाटोदा, शिरुर, बीड तालुक्यातील रोहयो मजुरांना त्यांनी केलेल्या कष्टाच्या मोबदल्यात ९६५१ क्विटंल धान्य ( गहु आणि तांदुळ ) गेल्या १४ वर्षापासुन आंदोलने करुन ही मिळत नाही. त्याला बीड जिल्हयातील लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे मत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी व्यक्त केले. व या बाबतीत रोहयो उपजिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदन दिले असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन ( रोहयो ) विभागातील कक्ष अधिकारी अंजली परदेशी यांनी रोहयो मंत्री यांच्या आदेशावरुन दिनांक ३० जानेवारी २०१६ व २२ जुन २०१६ रोजी च्या पत्रामध्ये विभागीय आयुक्त औरंगाबाद व जिल्हाधिकारी बीड यांना वरील विषयासंदर्भात झालेल्या कार्यवाहीचा अहवाल मागितला आहे. त्या वर कोणती ही कार्यवाही जिल्हाधिकारी बीड, उपजिल्हाधिकारी रोहयो व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कोणता ही अहवाल शासनाला पाठविलेला नाही. किंवा आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींना कळविले नाही. या सर्व विषयाला बीड जिल्हयातील प्रमुख अधिकारी व लोकप्रतिनिधी कष्टकरी मजुरांच्या १४ वर्षाच्या वनवासाला किती संवेदनशिलतेने घेत आहेत हे या वरुन दिसुन येते अजुन किती दिवस या मजुरांना अन्न धान्य वाचुन उपाशी ठेवणार आहात ? असे मत भाई विष्णुपंत घोलप यांनी व्यक्त केले आहे.