पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा तालुक्यात रस्त्याचे काम जोरात चालू आहे हे चांगली गोष्ट आहे परंतु विकास कामे चालू असताना रस्त्यावर जिथे रस्त्याचे काम चालु आहे तिथे रस्ता बंद आहे किंवा इतर सूचनेचे बोर्ड लावावे लागतात ते न लावल्यामुळे अनेक वाहतूकदारांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आसुन पाटोदा शहरातील शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचा थर साचल्याने चिखलामुळे शेकडो गाड्या घसरून पडल्या असल्याने पाटोदा तालुक्यातील रस्ते जीवघेण्यास्वरूपाचे झाले आहेत. यामुळे बांधकाम विभागाने रस्त्याचे काम चालू आहेत तिथे गुत्तेदाराना सूचना बोर्ड लावण्याचे आदेश द्यावेत. पाटोदा नगरपंचायतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर साचलेल्या चिखलाचा बंदोबस्त करुन वाहनचालकांचे जीव वाचवावेत अशी मागणी पाटोदा शहरातील व्यापारी वर्गातून होत आहे.