जातीपातीच्या पलिकडे साधला जिल्ह्याचा सर्वांगिण विकास
बीड दि.०२:आठवडा विशेष टीम―राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आष्टी मतदारसंघाला भरभरून निधी देवून मतदारांचे आभार मानले. जातीपातीच्या पलिकडे जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य देणार्या आष्टी मतदारसंघाला त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 38 कोटीचे रस्ते मंजूर केले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना आष्टी मतदारसंघातून सत्तर हजार इतके सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते, याची जाण ठेवून पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या विविध योजनांमार्फत भरभरून निधी देवून मतदारांचे आभार मानले आहेत. जातीपातीच्या पलिकडे बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधताना त्यांनी या मतदारसंघातील आष्टी, पाटोदा व शिरुरकासार तालुक्यातील 65 किमी लांबीच्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी 37 कोटी 58 लाख 63 हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्त्यांची 20 कामे होणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संशोधन व विकास अंतर्गत मंजूर झालेली मतदारसंघातील तालुकानिहाय कामे पुढीलप्रमाणे -(कंसातील आकडे कि.मी.चे आहेत), आष्टी तालुका- रामा 57 ते हंबर्डे वस्ती रस्ता-1 कोटी 81 लाख 85 हजार (2.80 किमी), प्रजिमा 2 ते दिंडेवस्ती- मंगरुळ- तोडकर वस्ती- इजिमा 108 – 1 कोटी 92 लाख 58 हजार (3.50 किमी), प्रजिमा 8 ते करंजी-करेवाडी- मातावळी रस्ता-4 कोटी 23 लाख 21 हजार (9.70 किमी), इजिमा 4 ते महादेववाडी -सुरनारवस्ती-2 कोटी 56 लाख 57 हजार (4.20 किमी), प्रजिमा 4 ते शंकरनगर – 61 लाख 30 हजार (1.10 किमी), इजिमा 1 ते जोमदरातांडा – 93 लाख 72 हजार (1.30 किमी), हिवरा ते लगडवस्ती- इजिमा 4- 2 कोटी 65 लाख 7 हजार (3.60 किमी), पाटोदा तालुका – रामा 62 ते पारगाव घुमरे वस्ती – ढाळेवाडी -2 कोटी 1 लाख 2 हजार (3.30 किमी), रामा 64 ते बोडकेवाडी रस्ता- 1 कोटी 40 लाख 39 हजार (2.60 किमी), इजिमा 31 ते रामवाडी – 40 लाख 74 हजार (0.70 किमी), प्ररामा 16 ते पोकळे वस्ती (अंमळनेर) -62 लाख 96 हजार (1.00 किमी), प्रजिमा 16 ते रायतेवस्ती -1 कोटी 43 लाख 28 हजार (2.25 किमी), प्रजिमा 16 ते तगारवाडी रस्ता -86 लाख 7 हजार (0.60 किमी), प्ररामा 16 ते मस्के वस्ती, मांडवेवाडी, नागेशवाडी-4 कोटी 58 लाख 73 हजार (8.75 किमी), प्रजिमा 13 ते जगदरावस्ती -3 कोटी 14 लाख 41 हजार (5.00 किमी), प्रजिमा 5 ते जोगदंडवाडी -1 कोटी 68 लाख 52 हजार (3.30 किमी), प्रजिमा 13 गंडाळवाडी- 58 लाख 86 हजार (2.00 किमी), प्रजिमा 3 ते सरवदे वस्ती -1 कोटी 2 लाख 40 हजार (1.60 किमी), शिरुर तालुका – प्ररामा 16 ते शिरापूर (धु), आनंदवाडी, काकडहिरा- 4 कोटी 7 लाख 42 हजार (6.45 किमी), इजिमा 15 ते उखळवाडी रस्ता-99 लाख 53 हजार (1.40 किमी) हे रस्ते मंजूर करण्यात आले असुन लवकर याचे काम सुरू होणार आहे.