अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

भारतीय बौद्ध महासभेची अंबाजोगाई तालुका नुतन कार्यकारीणी जाहीर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
भारतीय बौद्ध महासभा अंबाजोगाई तालुका नुतन कार्यकारीणी निवडीसाठी बुधवार,दिनांक 19 फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सर्वानुमते चर्चा होवून नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बीड (पुर्व) या धम्म संस्थेची महत्वपूर्ण बैठक बुधवार,दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी माता रमाई बुद्धविहार,माता रमाई चौक, अंबाजोगाई येथील जिल्हा कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत भारतीय बौद्ध महासभा अंबाजोगाई तालुक्याच्या नवीन कार्यकारीणीची निवड करण्यासंदर्भात चर्चा होवून
सर्वानुमते भारत सातपुते (अध्यक्ष),राजाभाऊ घाटे,दिलीप वाघचौरे(उपाध्यक्ष संस्कार), मिनाताई कांबळे(उपाध्यक्ष महिला),पंकज भटकर (उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन), रखमाजी जोगदंड(उपाध्यक्ष संरक्षण),देवीदास घोबाळे (कोशाध्यक्ष),सुहास सरवदे (कार्यालयीन सचिव),युवराज होके(सचिव संस्कार),जयश्री मस्के(सचिव महीला),अजित रोकडे(सचिव संस्कार),रेखा वेडे(सचिव महीला),दयानंद कांबळे(सचिव प्रचार व पर्यटन), अक्षय सरवदे(सचिव संरक्षण), अनिल कांबळे(सचिव प्रचार व पर्यटन),संघपाल आचार्य(सचिव संरक्षण),ज्ञानोबा मस्के(हिशोब तपासणीस) तर संघटक म्हणून राजाभाऊ व्हावळे,किर्ती मस्के, निवृत्ती कांबळे,निर्मलाताई भागवत यांचा समावेश आहे. कार्यकारिणी निवड समितीत भारतीय बौध्द महासभा,जि. शाखा बीड (पुर्व) चे विद्यमान अध्यक्ष आयु.एस.बी.मोरे, सरचिटणीस आयु.बी.बी.धन्वे, संभाजीराव सोनवणे (कोषाध्यक्ष),श्रीपती वाघमारे, संतोष बोबडे,गुलाबराव प्रधान, एन.बी.राजभोज , श्रीमती कमलताई डोंगरे,कासारे आण्णा,अरूण पटेकर,रामराव गाडे,मधुकर कदम,मीनाताई परतवाघ या विद्यमान पदाधिकारी यांचा समावेश होता.तर अंबाजोगाई तालुक्याच्या नवीन कार्यकारीणीची निवडीसाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बीड (पुर्व) या धम्मसंस्थेचे सर्व जिल्हा पदाधिकारी,भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अंबाजोगाईचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,तालुक्यातील सर्व कर्मचारी,विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक,डॉक्टर,वकील, व्यावसायीक,मजूर व कामगार बौद्ध उपासक-उपासिका हे उपस्थित होते.

Back to top button