परळी:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील टोकवाडी येथील संदीपान शेषराव मुंडे वय ३० वर्ष या युवकाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपविले असल्याची माहिती मिळत आहे.ही घटना आज (दि.3) सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, टोकवाडी येथील रहिवासी संदिपान शेषराव मुंडे याने टोकवाडी येथील आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या अडूला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जाधव हे करीत आहेत.