सोयगाव,दि.११:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील झाडावर अचानक लांब लचक सापाने चढून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणार्यांचे चांगलेच मनोरंजन केल्याचे गुरुवारी सायंकाळी घडले,दरम्यान झाडावर लीलया करणाऱ्या या चमत्कारिक सापाला पाहण्यासाठी मात्र रस्त्यावर मोठी बघ्यांची गर्दी जमली होती.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला तहसील कार्यालयाच्या आवारातील झाडावर अचानक साप चढून झाडांच्या फांदीवर या सापाच्या लीलया पाहण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी झाडाच्या खाली मोठी गर्दी केली होती.या सापाने भर्रकन झाडावर चढून फांदीवर बसून शहरवासीयांना दर्शन दिले दरम्यान सरपटनाऱ्या खादिखाफचा पाठलाग करत हा साप झाडावर चढल्याचे बघ्यांनी सांगितले,दरम्यान झाडावरील खादिखाफ आणि लांबलचक साप यांच्यात झाडावरच मात्र टोळीयुद्ध सुरु झाल्याचे शहरवासीयांनी उघड्या डोळ्यांनी पहिले.
0