प्रा.संजय राख यांची प्रोफेशनल टीचर असोसिएशनच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी निवड

पाटोदा दि.०३:शेख महेशर― प्रोफेशनल टीचर असोशियन्सची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पाटोदा येथे बीड जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे बीड जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र दुरूंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकी मध्ये क्लासेस क्षेत्रातील येणाऱ्या अडचणीवर सविस्तर चर्चा होऊन पाटोदा तालुका प्रोफेशनल टीचर असोशियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष म्हणून संजय राख यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष म्हणून श्री घोलप सर तालुका सचिव अमोल पवार सर तालुका कोषाध्यक्ष म्हणून चौरे सर तालुका
सहसचिव म्हणून अविळे सर तालुका खजिनदार म्हणून सचिन सर तर सदस्य म्हणून शिंदे सर, कोठुळे सर, सानप सर, निर्मळ सर, परजने सर, खोसे सर, खंडागळे सर, गर्जे सर, जोशी सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संजय राख सह नुतन कार्यकारिणीचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. नवीन कार्यकारिणीचे सर्व क्लासेस संचालकांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शहरातील सर्व क्लासेसचे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आविळे सर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार अतुल शिंदे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *