औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
सोयगाव(ज्ञानेश्वर धोंडू पाटील)दि.१४: तालुक्यातील बनोटी पोलीस दुरक्षेत्र चौकी अंतर्गत परिसरात कल्याण- मुंबई वरळी मटका जुगार, पत्त्यांचे तिरर्ट जुगार,अवैद्य वाळू वाहतूक,व जळगाव जिल्ह्यातून आलेली विनापरवाना बनावट देशी विदेशी दारू अवैद्य धंदे खुलेआम सरार्स सुरू आहे. या अवैद्य धंद्यांना दस्तुरखुद्द पोलिसांचा छुपा आशीर्वाद असल्याची येथील पोलीस चौकी हप्ता वसुली केंद्र बनल्याचे चर्चा होत आहे.
सोयगाव : ताळेबंद पोलीस दुरक्षेत्र बनोटी
सोयगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत बनोटी येथे गोंदेगाव जिल्हा परिषद गटातील खेडेगावासाठी पोलीस दुरक्षेत्र कार्यालय आहे. हे पोलीस कार्यालय नेहमी कुलूप बंद असते. एखादया किरकोळ किंवा गंभीर गुन्ह्यातील गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी गेल्यास तेथे फिर्यादीला तासनतास बसून पोलीसांची वाट पहावी लागते. वारंवार फोन लाऊन पोलीस कार्यालयात येत नसल्याने फिर्यादीला आपला वेळ व पैसा वाया घालवीत ४० ते ५० किलोमीटर तालुका सोयगाव स्टेशला येऊन आपली तक्रार दयावी लागते.
बनोटी पोलीस दुरक्षेत्रात येणाऱ्या बनोटी, वरठाण, गोंदेगाव आदी प्रमुख गावासह खेड्यापाड्यात अवैद्यधंदे वाल्यांनी डोक वर काढले असून जळगाव जिल्ह्यातील काही माफियांनी आपले अवैद्य व्यावसाय खुलेआम सुरू केले आहेत. यात प्रामुख्याने कल्याण मुंबई वरळी मटका पैश्यांचा जुगार, अवैद्य वाळूसाठे करून चढ्या भावाने विक्री,पत्त्यांचे तिरर्ट क्लब, विना परवानगी देशी विदेशी दारू विक्री,आदी व्यवसायांचा समावेश आहे.
झिरो पोलिसांच्या भरवश्यावर कायदा व्यवस्था :
या सर्व अवैद्य धंद्याच्या वसुलीसाठी बनोटी पोलिसांनी काही जुन्या गुन्ह्यातील आरोपी असलेले गुंड प्रवृत्तीचे झिरोपोलीस अनधिकृतरित्या नेमलेले असून ते जणू आपणच पोलीस अधिकारी असल्याची बनावट करून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतात. कोणत्याही छोट्या मोठ्या गुन्ह्यात या झिरो पोलिसांच्या भूमिका महत्त्वाची समजण्यात येते व तोडीपाणी आधारे गंभीर प्रकरण दाबले जात असते.? या पोलीस चोकीला प्रत्येक अवैद्य धंद्याच्या बदल्यात किमान ३ ते ५ लाख रुपयांची हप्तारुपी कमाई होत असल्याची माहिती सूत्राकडून समजते.
बनोटी पोलीस चौकी सोन्याची अंडी देणारी कोंबडी:
सोयगाव तालुक्यातील सर्वात जास्त कमाई असलेल्या या पोलीस चौकीला बिट जमादार होऊन येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळून महिन्याकाठी ठरलेला ठराविक चिरीमिरी द्यावी लागते. यात पोलीस हेड कॉन्स्टेबलची दरमहा लाखोंच्या घरात वरची कमाई होत असल्याने पोलीस स्टेशनच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल बनोटी दुरक्षेत्र कार्यालय मिळावे यासाठी स्पर्धा लागलेली असते.
तक्रारबेसवर बदली होऊन देखील पोलीस जमादार योगेश झालटे पुन्हा रुजू:
पूर्वी साडेतीन वर्ष बनोटी पोलीस दुरक्षेत्राचे बिट पोलीस जमादार असलेले योगेश झालटे यांचे या भागात अवैद्य धंदेवाईक माफिया व राजकीय पुढाऱ्यांसोबत सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बनोटी परिसरातील जनतेच्या पीडित जनतेकडून खूप तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयात मात्र त्यांना काही राजकीय पुढाऱ्यांसोबत अवैद्य धंद्याच्या माफियांनी पुन्हासर्वसामान्य जनतेच्या नाकावर टिच्चून बनोटी पोलीस चोकीला बदली करवून घेतली आहे.
पोलीस अधिक्षकांकडून जनतेची अपेक्षा :
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी ग्रामीण भागात आपला पोलीस खाक्या दाखविल्याने बनोटी पोलीस दुरक्षेत्रातील गावातील गावागावातून जळगाव जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायिकांनी पळ काढला होता मात्र त्यांच्या बदली नंतर नव्याने बदलून आलेल्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील रुजू होताच अवैद्य धंदे बोकाळले आहेत. याकडे नवीन आलेल्या पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
―या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख शकील यांच्याशी संपर्क केला असता मी नेहमी बनोटी विभागात संपर्क ठेवत असतो. मात्र असला कोणताही प्रकार मला आढळून आलेला नाही. असा प्रकार आढळल्यास मी नक्की कार्रवाई करील.असे म्हटले.