सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―राज्य आणि केंद्राचा वीस टक्के गणवेशाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याने सोमवार पासून सोयगाव तालुक्यातील शालेय पात्र विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात ३९ लाख ६९ हजार ६०० इतका निधी वर्ग करण्यता आल्यानंतर तातडीने १६४३ वंचित विद्यार्थ्यांसाठी नऊ लाख ८० हजार ४०० रु निधी वर्ग करण्यात आल्यावर तब्बल ८२५० पात्र विद्यार्थ्यांचा गणवेशाचा मार्ग मोकळा होवून गणवेशासाठी ४९ लाख ५० हजार इतका निधी सोयगावला उपलब्ध करण्यात आल्याने सोयगाव तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये व्यवस्थापन समितीच्घ्या वतीने गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे जरंडी ता.सोयगाव येथील प्राथमिक शाळेत पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना गणवेश वितरण करण्यात आले यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप महाजन ,उपसरपंच सुनील पवार,मुख्याध्यापक बाळू सूळ,आदींचं हस्ते गणवेश वितरण करण्यात आले यावेळी डी.बी तुंबनवाड,शिल्पा चौधरी,एल.के शेकोकार,आर.जे जाधव,संजय पाटील,रवींद्र गायकवाड,बी.टी गहिरे,आदींची उपस्थिती होती.