बीड(प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर झालेल्या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध नोंदवतो. हा हल्ला राष्ट्रवादीच्याच गणेश कदम नावाच्या स्थानिक कार्यकर्त्यांने केला आहे. निवडणुकीला जातीय स्वरूप देण्यासाठी राष्ट्रवादीचे लोक सदरील हल्ला भाजप कार्यकर्त्यांने केला असल्याची अफवा पसरवत आहेत. यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सांगून राष्ट्रवादी किती खालच्या स्तराला जावून राजकारण करत आहे. याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे कुंडलीक खांडे यांनी म्हटले आहेे.
केज तालुक्यातील धर्माळा येथे सारीका सोनवणे यांची सभा सुरू असताना राष्ट्रवादीतील दोन कार्यकर्त्यांमध्ये दारू पिल्यानंतर वाद झाला. हा वाद सभेपासून 200 मिटर अंतरावर झाला. यानंतर वाद करणारा राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता सभेच्या ठिकाणी आला आणि त्याने गोंधळ घातला. या प्रकाराचा निषधच मात्र राष्ट्रवादीचे लोक त्यांच्याच कार्यकर्त्यांने दारू पिऊने केलेल्या गोंधळाचे भांडवल करण्यासाठी भाजपकडे बोट दाखवत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अतिषय खालच्या पातळीचे राजकारण करत असून यावर जनतेने विश्वास ठेवू नये. असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांनी केले आहे. पराभव समोर दिसू लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते मतदारांची दिशाभूल करत आहेत. जातीय तेढ निर्माण करून त्यांना सहानूभूती मिळवायची आहे, असे सांगून कोणाला शंका असल्यास जिल्हा पोलिस प्रशासन अथवा संबंधित पोलिस स्टेशनशी संपर्क एकंदरीत विषयाची खात्री करावी. घडलेला प्रकार राजकीय कारणाने घडलेला नाही, असेही कुंडलीक खांडे यांनी म्हटले आहे.
0