औरंगाबाद: सोयगाव तालुक्यातील घोसला गावात घर कोसळले,ग्रामस्थ भयभीत

सोयगाव:आठवडा विशेष टीम―सोयगावसह परिसरात बुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने भिंतीला तडा जावून घर कोसळल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटे घोसला ता.सोयगाव गावात घडली दरम्यान या घटनेत कोणतीही इजा झालेली नसल्याची माहिती हाती आली आहे.घर कोसळण्याचा आवाज येताच झोपलेल्या कुटुंबीयांनी पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
सोयगावसह परिसरात रात्रीपासून सुरु असलेला रिमझिम पावूस गुरुवारी सायंकाळपर्यंत कोसळत असल्याने तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.दरम्यान रिमझिम पावसामुळे गुरुवारी शेतीकामे ठप्प झाले असल्याने मजुरांना घरीच बसावे लागले होते,दरम्यान परिसरात झालेल्या रिमझिम पावसाने तालुकाभरात दाणादाण उडवून दिली होती.घोसला (ता.सोयगाव)येथील हिलाल कडूबा कोल्हे(वय ४५)कुटुंबासह घरात झोपले असतांना त्यांना अचानक भिंत कोसळण्याचा आवाज आल्याने त्यांनी घराबाहेर पळ काढताच घर कोसळले पत्राचे असलेले घराच्या व्हरांड्याच्या भिंतीला तडा गेल्याने भिंतीसह पत्राचे घर पत्त्याप्रमाणे कोसळले,या प्रकरणी अद्याप पंचनामा करण्यात आलेला नव्हता.दरम्यान वेळीच सतर्कता बाळगल्याने या घटनेत कोणताही अनर्थ घडला नाही.

तालुकाभर रिमझिम-

बुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने कमी अधिक प्रमाणावर जोर धरत गुरुवारी सायंकाळपर्यंत रिमझिम पावसाचा तालुकाभर जोर ओसरलेला नव्हता,त्यामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.शालेय विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती.शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतीकामे ठप्प झाली होती.त्यामुळे पिकांचं आंतरमशागतीचे कामेच न झाल्याने मजुरांना सुटी होती.

बनोटी-सोयगाव रस्ता पाण्याखाली-

बनोटी-सोयगाव रस्त्याच्या दुतर्फा पाण्याची विल्हेवाट न लावण्यात आल्याने रस्त्याच्या नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने बनोटी-सोयगाव रस्ता पाण्याखाली आला होता त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक काहीकाळ बंद झाली होती.दुपारनंतर रस्त्यावरील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.