सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव परिसरात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मका आणि कपाशी पिकांवर अळींच्या प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले कामगंध सापळ्यामध्ये किटकाऐवजी पाणीच पाणी साचून अळी मात्र कपाशी आणि मका पिकांवर सुरक्षित असल्याने खरिपाच्या पिकांच्या नुकसानीची पातळी वाढली आहे
सोयगाव तालुक्यात ढगाळ वातावरण अळींच्या प्रादुर्भावासाठी पोषक बनले आहे.तब्बल पंधरा दिवसाच्या ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसात पिकांच्या क्षेत्रात लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यामध्ये अळी आणि किटकाऐवजी पाणी साचल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहे.दरम्यान कामगंध सापळ्यांच्या कीटकांना आकर्षित करण्यात आलेल्या लावण्यात आलेल्या गोळ्या पाण्यात विरघळून गेल्याने पाण्याने भरलेले सापळे शेतात उभे राहिले आहे.यामुळे प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी सापळे काढण्याच्या कामे वाढल्याने शेतकरी कंटाळला आहे.मका पिकांच्या प्रादुर्भावाने मका पिके हातातून गेल्यात जमा असतांना कपाशी पिकांवरही प्रादुर्भाव वाढला असतांना रिमझिम पावसाने कपाशीची झाडे पिवळी पडून अर्धमेली झाल्याचे चित्र आहे.
यंदाच्या हंगामात रिमझिम पावूस घातक-
यंदाच्या पावसाळ्यात खरीपाचा हंगाम जून अखेर पर्यंत जोमदार असतांना जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झालेला पावूस आगस्टच्या मध्यापर्यंत सुरूच राहिल्याने खरिपाच्या पिकांना धोकादायक ठरलेल्या पावसाने नुकसान केले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.