सोयगावला महसूल दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित
सोयगाव,ता.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―शासनाच्या कर्मचाऱ्यांनी लोकसेवक बनून काम केल्यास मिळालेला आनंद त्यापेक्षाही वेगळा आहे.शासन पातळीत काम करतांना आठ तास मन एकाग्र करून काम केल्यास ताण दूर होतो,त्यामुळे मानसिक दृष्ट्या सबळ राहण्यासाठी जनतेच्या कामात रमणारा हाच कर्मचारी आहे.असे मत विभागीय कार्यालयाचे उपायुक्त विजयकुमार फड यांनी शुक्रवारी सोयगावला व्यक्त केले.
महसूल दिनाचे औचित्य साधून ३३ कोटी वृक्षलागवड आढावा,उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी तहसील कार्यालयात करण्यात आले होते,यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी(उपविभागीय अधिकारी सिल्लोड)प्रमुख पाहुणे विभागीय कार्यालयाचे उपायुक्त विजयकुमार फड,प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे,गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी,तहसीलदार प्रवीण पांडे,आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करतांना कष्ट करणे हाच कर्मचाऱ्याचा पुरस्कार आहे.शासकीय कार्यालयात संकलित करण्यात आलेल्या योजनांच्या संचिकांच्या मागे कुटुंब असते हे गुर्हीत धरून आलेल्या संचिकेचा कुटुंब डोळ्यासमोर ठेवून काम करा.कर्मचार्याच्या एका पेन मध्ये खूप ताकद आहे.त्यामुळे मोठ समजण्यापेक्षा चांगुल पणाचे लक्षण अंगीकारून जनतेचे काम करा,तुमच्या पेक्षा मोठा कुणीही नाही.शासकीय कार्यालयात काम करतांना मनस्थिती सकारात्मक ठेवल्यास ताण येत नाही कर्मचाऱ्याने काम करतांना कधीही रडू नये जनतेच्या भावना तुमच्याशी जुडलेल्या आहे.असे प्रतिपादन विजयकुमार फड सत्कारार्थी कर्मचाऱ्यांशी हितगुज करतांना केले.दरम्यान यावेळी जिल्हा उत्कृष्ट पुरस्कार मिळालेल्या सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांचा सोयगाव तालुक्याचं वतीने सत्कार करण्यात आला.त्यानंतर तहसील कार्यालयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना महसूल मित्र म्हणून पुरस्काराने उपायुक्त विजयकुमार फड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तहसील कार्यालयाच्या आवारात ३३ कोटी वृक्षलागवड योजनेत वृक्षारोपण करण्यात आले.डॉ.अशोक नाईकवाडे,उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी,तहसीलदार प्रवीण पांडे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी मला मिळालेला पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने मिळालेला आहे.त्यामुळे माझा पुरस्कार मी कर्मचाऱ्यांना समर्पित करण्याची घोषणा प्रवीण पांडे यांनी केली.
सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार प्रवीण पांडे यांचं संकल्पनेतून महसूल ग्रंथालयचा शुभारंभ विजयकुमा फड यांचं हस्ते करण्यात आला.महसूल कर्मचाऱ्यांना महसुली कायद्याचे ज्ञान सहज उपलब्ध होण्यासाठी या ग्रंथालयाचा शुभारंभ करण्यात आल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
पुरस्काराने गौरविण्यात आलेले कर्मचारी-कडूबा मांडवे,सुधीर जहागीरदार,शांताराम पाटील,संतोष सोनवणे,दीपक फुसे,अनिल पवार,विठ्ठल जाधव,प्रभाकर गवळी,सचिन ओहोळ,संभाजी बोरसे,मंगेश दाढे,संजय ताले,राम मुरकुटे,करण सोनवणे,आदी १८ कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमासाठी तालुका प्रशासनाच्या वनविभाग,सामाजिक वनीकरण,सोयगाव आगारप्रमुख,लघुपाट बंधारे जिल्हा परिषद,पाटबंधारे,सिंचन,पंचायत समिती,या सर्वच यंत्रांचे प्रमुख उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ.प्रशांत देशमुख,स्वाती बळसाने,राम मुरकुटे,आदींनी केले प्रास्ताविक तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी केले.