सोयगाव,ता.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―राज्य ग्रामसेवक संघटनेच्या विविध प्रलंबित आठ न्याय मागण्यांसाठी शुक्रवारी(ता.९)आगस्ट क्रांतीदिनी सोयगाव पंचायत समिती कार्यालयासमोर राज्य ग्रामसेवक तालुका संघटनेच्या वतीने असहकार आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना देण्यात आले.
दरम्यान ग्रामसेवक संघटनेच्या प्रलंबित आठ मागण्यांमध्ये प्रमुख मागणी ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी हि पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे हि असून यासह विविध आठ प्रलंबित मागण्यांसाठी हे असहकार आंदोलन करण्यात आले आहे.असून पहिल्या दुसऱ्या टप्प्यात ता.१३ जिल्हा परिषद औरंगाबादला धरणे आंदोलन,करण्यात येणार आहे.निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुनील राकडे,सचिव सुनील मंगरुळे,महेंद्र निकम,पल्लवी जहागीरदार,शारदा पवार,गणेश गवळी,तुळशीराम गोसावी,समाधान मोरे,सुनील पाटील,सुरेश काळे,ढेपे,पाटील,पोकळे,आदींच्या स्वाक्षर्या आहे.