सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―रामपूरवाडी ता.सोयगाव येथील आदिवासी भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत गणवेश वितरण करण्यात आल्याने ७२ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याची चिंता या आदिवासी विद्यार्थ्यांची मिटली आहे.दरम्यान गणवेश वितरणाने आदिवासी विद्यार्थी चमकू लागल्याने तालुकाभर या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
रामपूरवाडी ता.सोयगाव या आदिवासी शाळेत ३४ विद्यार्यांना शाळेचे शिक्षक एल.जी गट्टूवार यांनी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण केले,दरम्यान या उपक्रमात निंबायती उपकेंद्राच्या आरोग्यासेविकाही उपस्थित राहून या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याने गणवेशातील आदिवासी विद्यार्थी चमकू लागले होते.
0