आठवडा विशेष टीम―महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीत बाधित झालेल्या लोकांच्या पाठीशी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भक्कमपणे उभा राहील. तसेच या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्ष व जनसंघटनांचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतील, अशी ग्वाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड डी. राजा यांनी दिली.
महासचिवपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच ते महाराष्ट्रात आले होते. मुंबईत आगमन होताच त्यांचे महाराष्ट्र राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्यावतीने सहर्ष स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात कॉम्रेड डी. राजा यांनी भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांवरही कडाडून टीका केली.
याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड डॉ. भालचंद्र कानगो, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, कॉम्रेड मिलिंद रानडे, कॉम्रेड नार्वेकर, कॉम्रेड बबली रावत यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.