सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पळाशी ता सोयगाव येथील महादेव मंदिराच्या धारेश्वर धबधब्यावर आंघोळ साठी गेलेल्या पर्यटकांचा पाय घसरून कुंडाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वाकी ता कन्नड येथील पाच तरुण पर्यटक पळाशी ता सोयगाव शिवारातील धारेश्वर धारकुंड येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन धबधब्याच्या प्रवाहात अंघोळी साठी गेले असता,त्यातील अविनाश राजू पवार वय 18 हा आंघोळीसाठी प्रवाहात उतरून त्याचा पाण्याचा अंदाज चुकल्याने त्याचा तोल जाऊन पाण्यात बुडाला दरम्यान मंगळवारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगून आल्याचे ग्रामस्थांना आढळून आल्यावरून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुंडात शोधकार्य करून मृत अविनाशचा मृतदेह बाहेर काढला. मृतावर चिंचोली लिंबाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे जमादार सुभाष पवार,प्रदीप पवार,कौतुक सपकाळ,दीपक पाटील आदी करत आहे.