बीड: स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे पाटोद्यात आयोजन

पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा तालुक्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निम्मित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमातन जो निधी जमा होणार आहे तो सांगली व कोल्हापूर येतील पूरग्रस्तांना झालेल्या नुकसान तसेच हानी यास मदत कार्य व पुनर्वसन साठी मुख्यमंत्री निधीत जमा करण्यात येईल .या कार्याक्रमात यशस्वी स्पर्धकांना प्रथम,द्वितीय,त्रितीय पारितोषिक दिले जातील व जिल्हास्तरीय व स्वरगंध संगीत विद्यालयाचे प्रमाणपत्र दिले जाईल तरी जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे स्पर्धा दि १५ / ०८ / २०१९ रोजी सकाळी ११ . ०० वाजता रेणको माता मंदिर , पाटोदा येथे होतील स्पर्धेत सहभागी होण्या करता स्वरगंध संगीत विद्यालय पाटोदा येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन माउली अलंकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित स्वरगंध संगीत विद्यालय पाटोदा व नेहरू युवा केंद्र,संस्थेचे सचिव श्री.प्रा.विजय गायकवाड यांनी केले आहे असुन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९७६७६७८१२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.